भावना भिंगारदिवेचे राज्य लोकसेवा परीक्षेत यश


ध्येय, चिकाटी व कष्टाच्या जोरावर स्वप्न साकरता येते : आ. संग्राम जगताप
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : ध्येय, चिकाटी व कष्टाच्या जोरावर आपण बाळगलेले स्वप्न साकार करता येते. विद्यार्थी जीवनामध्ये प्रत्येकाने ध्येय निश्‍चित करुन वाटचाल करावी. आजच्या युगामध्ये विविध क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी कष्ट करावे. राज्य लोकसेवा आयोगाच्या घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये भावना भिंगारदिवे हिने वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रातून चौथ्या क्रमांकावर यश मिळवून आजच्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

राज्य लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये भिंगारची भावना भिंगारदिवे हिने वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रातून चौथ्या क्रमांकावर यश मिळवल्याबद्दल तिचा सत्कार करताना आ. संग्राम जगताप. समवेत ज्येष्ठ नेते श्रीराम येंडे, विजय भिंगारदिवे, नगरसेवक अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, बाळासाहेब पवार, आरिफ शेख, अक्षय भिंगारदिवे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी भावना भिंगारदिवे म्हणाली की, अभ्यासाच्या जोरावर यश संपादन करता येते. वेळेचे योग्य नियोजन करुन नियमित अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते. पीएसआय होण्यासाठी बाळगलेले स्वप्न कठोर परिश्रम व मिळालेल्या योग्य मार्गदशनाने पूर्ण झाले. यापाठीमागे आई-वडिलांबरोबर शिक्षक वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले, असे ती म्हणाली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post