कोरोनाशी मुकाबला : अहमदनगर, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड आणि मुंबईतील दुकाने 31 मार्चपर्यंत बंद


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 52 वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता सरकारी कार्यालयात फक्त 25 टक्के कर्मचारी काम करणार असल्याचे सांगितले. दरम्यान पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि मुंबई एमएमआरडीए येथे अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली. गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळपर्यंत राज्यात कोरोनाचे 52 प्रकरणे समोर आले आहेत. तर पुणे आणि मुंबईच्या रुग्णालयात दाखल असलेल्या 5 कोरोना पीडितांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना लवकरच घरी सोडले जाऊ शकते. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

मुंबईत बस आणि लोकल बंद होणार नाहीत
उद्धव ठाकरे म्हणाले की, लोक आणि बससेवा बंद करण्याची लोकांमधून मागणी होत आहे. पण या दोन्ही मुंबईच्या लाइफलाइन आहेत आणि यांना पूर्णपणे बंद करणे शक्य नाही. यामुळे जे लोक कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी काम करत आहेत त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आम्ही लोकांना आवाहन करत आहोत की, गरज असेल तरच घराबाहेर पडा.

खासगी कंपन्यांना पगार न कापण्यास सांगितले
ऑफिसमध्ये न येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कपात करू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी खासगी कंपन्यांना केले आहे. त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता दुकाने बंद करण्याचा निर्णयाचे स्वागत केले.

कोरोनावर तयार केलेली शॉर्टफिल्म रिलीज केली
मुख्यमंत्र्यांनी कोरोना व्हायरसवर तयार केलेली एक शॉर्टफिल्म रिलीज केली आहे. रोहित शेट्टीने याचे दिग्दर्शन केले आहे तर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, रणवीर कपूर, आलिया भट्ट, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसह अनेक नामवंत कलाकार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post