तरुणाचा खून


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथील टोलनाका परिसरात एका तरुणाचा खून करून मृतदेह आणून टाकला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मोहन बोरसे घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरदायी तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या तरुणाची ओळख पटली नसून मारहाण करत खून करून मृतदेह बांधून टोलनाका परिसरात आणून टाकला आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post