‘यंदा होळी खेळणार नाहीत’
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर होळीचा कोणत्याही कार्यक्रमांना हजेरी लावणार नाही, तसेच होळी देखील साजरी करणार नसल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
दरम्यान दोन दिवसांपासून विशेष चर्चेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आज एका नव्या ट्विटद्वारे दिवसाची सुरवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरस दिल्लीतही येऊन धडकला आहे. पाच ते सहा संशयित रुग्ण आढळले असून देशभरात वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात येत आहे.
Narendra Modi
✔
@narendramodi
Experts across the world have advised to reduce mass gatherings to avoid the spread of COVID-19 Novel Coronavirus. Hence, this year I have decided not to participate in any Holi Milan programme.
103K
11:33 AM - Mar 4, 2020
Twitter Ads info and privacy
25.1K people are talking about this
या पार्श्वभूमीवर मोदींनी यंदा होळीच्या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे ट्विट केले आहे. जागतिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार मोठ्या संख्येने लोकांनी एकत्रित येण्यास मज्जाव केला आहे. यामुळे जगभर नमस्ते अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाारतीयांना दिला आहे.
Post a Comment