आमदारांना ‘अच्छे दिन’
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडला. हरिवंशयाय बच्चन यांच्या कवितेतील काही ओळींचा संदर्भ घेत. मागील सरकारच्या चुका दुरुस्त करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारल्याचे सांगत भाजपला अजित पवार यांनी टोला लगावला.
महाविकास आघाडीच्या पहिल्याच अर्थसंकल्पात आमदार विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटींवर करण्यात आला. यासोबतच पाच वर्षात विकास निधी 15 कोटींवर नेणार असल्याचेही मत पवार यांनी मांडले.
अजित पवारांनी विकास निधी वाढविण्याची घोषणा करताच आमदारांकडून बाक वाजवून जोरदार स्वागत करण्यात आले. आता आमदारांना मतदारसंघातील विकासासाठी 2 कोटींऐवजी 3 कोटींचा निधी मिळणार आहे. त्यामुळे मतदार संघात विकासकामे अधिक होती अशीची चर्चा आमदारांमध्ये आहे.

Post a Comment