'महा'राष्ट्रीय आपत्ती! शनिवारी दिवसभरात १२ रुग्णांची पडली भर




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ३१ वर गेला आहे. पुणे १५, मुंबई ५, कामोठे पनवेल, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, नगर येथे प्रत्येकी १, यवतमाळमध्ये २ व नागपुरात ४ रुग्ण आढळले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे विधानसभेत म्हणाले, आरोग्य विभागाने राज्यातील सर्व सरकारी, खासगी शाळा व महाविद्यालये, अंगणवाडी, व्यवसाय प्रशिक्षण संस्था ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. १०वी, १२ वीच्या परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे होतील. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जनतेने लग्न समारंभ घरगुती पद्धतीने करावेत. खासगी ट्यूशन, कोचिंग क्लासेसही पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.

कुठे किती रुग्ण
पुणे 15
मुंबई 5
यवतमाळ 2
नागपूर 4
प्रत्येकी 1कामोठे पनवेल, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, नगर. अनेक ठिकाणी संशयितांवर उपचार सुरू.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post