‘त्यांनी’ बसविलेला पुतळा प्रशासनाने हटविला



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - छत्रपती संभाजी महाराज  यांचा पुतळा हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज रविवारी पहाटे सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात  बसविला. या प्रकाराची माहिती समजताच  महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात पुतळा हटविला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न  उद्भवू नये म्हणून पोलीस प्रशासनाने  मोठा बंदोबस्त तैनात केला आहेे.



      प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी सामाजिक संघटना व राजकीय पक्षाकडून होत होती. रविवारी पहाटेच्या सुमारास सुमित वर्मा, घनश्याम बोडखे यांच्यासह काही कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून पुढाकारातून छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला.

या याची माहिती मिळताच डिवायएसपी संदीप मिटके यांच्यासह तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महापालिका अधिकाऱ्यांना बोलावून  प्रोफेसर कॉलनी चौकात रात्रीतून बसविलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हटवला. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post