न्यूयॉर्क/बीजिंग- जगभरात मेडिकल प्रोफेशनल्स आणि संशोधक रुग्णामध्ये कोरोना व्हायरस कसा पसरतो आणि त्याचे शरीरावर काय परिणाम होतात, याचा शोध घेत आहेत. यासाठी कोरोना संक्रमित रुग्णाच्या फुफ्फुसाची 3D इमेज काढून, त्यातून शरीरावर होणारे परिणाम शोधले आहेत. शास्त्रज्ञांनी चीनमध्ये कोरोना व्हारयस (COVID-19) संक्रमणाने मृत्यू झालेल्या 1000 पेक्षा जास्त रुग्णांच्या पोस्टमॉर्टममधून त्यांच्या फुफ्फुसांची 3D इमेज तयार केली आहे.
हा परिणाम होतो
हा फोटो रेडिओलॉजिकल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका (RSNA) ने जारी केला आहे. फुफ्फुसांचा एक्स-रे आणि सीटी स्कॅनमधून समोर आले की, पीडित रुग्णांचे फुफ्फुस एकदम चिकने आणि घट्ट बलगम (म्यूकस)ने भरलेले आहेत. यामुळे फफ्फुसात हवा जाण्यासाठी मार्गच नाही आणि त्यामुळेच रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो.
पांढऱ्या डागामुळे मिळाला क्लू
COVID-19 रुग्णांच्या सीटी स्कॅनमधून त्यांच्या फुफ्फुसात एक पांढऱ्या रंगाचा डाग दिसत आहे. ज्याला रेडिओलॉजिस्टोंने आपल्या भाषेत ग्राउंड-ग्लास ओपेसिटी म्हटले आहे. तसेच, रुग्णांच्या फुफ्फुसात सीटी स्कॅनमधून निमोनियासारखे काही पॅचेस आढळले आहेत. पण, हे खूपच घट्ट आहेत आणि फुफ्फुसात हवा जाण्याच्या ठिकाणी इतर पदार्थ भरलेला दिसत आहे.
काय फायदा होईल
3D इमेज तयार झाल्यानंतर डॉक्टर एक्स-रे आणि सीटी स्कैनच्या मदतीने गंभीर आजारी रुग्णांची तपासणी सोप्या पद्धतीने आणि लवकर करू शकतील. चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरस (कोविड-19)ने आतापर्यंत 111 पेक्षा जास्त देशात आपला हाहाकार माजला आहे. यामुळे आतापर्यंत 4,640 जणांचा मृत्यू झाला असून 1 लाख 26 हजारांपेक्षा जास्त लोकांना याचे संक्रमण झाले आहे.
सार्सचे लक्षणदेखील असेच होते
2002 मध्ये जगभरात पसरलेल्या ‘सार्स’ रोगामध्येही कोरोनाप्रमाणेच एक्स-रे आणि सीटी स्कॅनमधून असेच रेकॉर्ड मिळाले होते. या रोगामध्येही फफ्फुसात पांढरे आणि डाग तसेच, बलगम भरलेले होते.
Post a Comment