कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांत योग्य त्या उपाययोजना कराव्यात: आ.संग्राम जगताप
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसचा वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाय-योजना करणे गरजेचे असून या पार्श्वभूमीवर नगर शहरातील शाळा, महाविद्यालये यांना काही दिवस सुट्टी देण्याचा विचार व्हावा, असे पत्र आ. संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांना दिलेल्या पत्रात आ. जगताप यांनी म्हटले आहे की, नगर शहरात शुक्रवारी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेला आहे. शहरात या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून त्या रुग्णाच्या संबंधित लोकांची तपासणी करुन खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच शहरातील शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे आदी गर्दीच्या ठिकाणी खबरदारी म्हणून योग्य त्या उपाययोजना होणे आवश्यक आहे. तसेच गरज असल्यास शाळा-महाविद्यालयांना काही दिवस सुट्टी दिल्यास योग्य राहिल, तरी याबाबत योग्य तो निर्णय घेवून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आ. जगताप यांनी म्हटले आहे
Post a Comment