मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपुरात अंशत: लॉकडाऊन




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्नांची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही. पुढील १५ ते २० दिवस अधिक काळजी घ्यावी लागेल. म्हणूनच राज्यातील शासकीय कार्यालयांतील उपस्थिती २५ टक्क्यांवर आणली जाईल. तसेच मुंबई महानगर, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर येथील सर्व दुकाने, आस्थापना व खासगी कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी केली. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य औषधी, दूध, इत्यादी दुकाने सुरू राहू शकतील. रात्री १२ वाजेपासून हे आदेश अमलात येतील. वर्क फ्रॉम होम न करणाऱ्या खासगी कंपन्यांवर कारवाई केली जाईल. महात्मा जोतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजनेअंतर्गत अतिदक्षतेचा कोरोनाबाधित रुग्णाचा खर्च सरकार करेल.
या सेवा-दुकाने सुरूच राहणार


लोकल आणि बसेस सध्या बंद नाही करणार. मात्र गर्दी कमी न झाल्यास तो पण निर्णय घेण्यात येईल. अन्नधान्य, दूध, मेडिकल ही दुकाने सुरू राहणार. सर्व बँका, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियंत्रित वित्तीय संस्थाही सुरू राहतील.

परदेशातून २४ हजार भारतीय येणार

अन्य देश, विशेषतः अरब देशांमधून येणाऱ्या सुमारे २४ हजार नागरिकांना पूर्ण तपासणी आणि काळजी घेऊन भारतात आणले जाईल. तपासणी करून निगेटिव्ह असलेल्यांना क्वारंटाइनसाठी तुर्भेतील अंबानी रुग्णालयात ठेवले जाणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post