'त्यांने' केला महिलेचा विनयभंग
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - 31 वर्षिय विवाहित महिलेचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तिचा विनयभंग करुन शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना स्टेशन रोड लगतच्या माणिकरोड परिसरात रस्त्यावर शनिवारी (दि.7) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली.
स्टेशन रोड परिसरातील 31 वर्षिय विवाहिता रस्त्याने जात असताना अनिल बाबासाहेब जाधव (रा.आनंदनगर, रेल्वे स्टेशन) याने तिला रस्त्यात अडवून तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच याबाबत कोणाला काही सांगू नये याकरीता शिवीगाळ करुन दमदाटी केली.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन कोतवाली पोलिसांनी अनिल जाधव याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली.
Post a Comment