महिलेचा परिचीताकडून विनयभंग


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- परिचीत असलेल्या इसमाने मोटारसायकलवर नेवून हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केला तसेच हाताच्या चापटीने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.10) सायंकाळी 5 वाजता घडली.

नगर परिसरात खासगी नोकरी करणार्‍या केडगाव परिसरातील 38 वर्षिय महिलेशी दीपक दत्तात्रय गव्हाणे (रा.घोगरगाव, ता.श्रीगोंदा) याच्याशी ओळख झाली. त्यातून त्याने सदर महिलेस माझ्याबरोबर फिरायला चल असे म्हटले. त्या महिलेने नकार दिल्यानंतर त्याने आग्रहाने तिला सोबत नेण्यास भाग पाडून मोटारसायकलवर बसून नगर-दौंड रोडवरील खडकी शिवारात हॉटेलमध्ये नेले व तेथे त्याने दारू पिऊन तिच्याशी असभ्य असे वर्तन केले. तिने प्रतिकार करताच राग येवून गव्हाणे याने तिला चापटीने व लाथा-बुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. तेथे आजुबाजुचे नागरिक जमा होऊ लागताच गव्हाणे याने सदर महिलेस मोटारसायकलवर बसवून बुरुडगाव रोडवरील विनायकनगर, माणिकनगर, परिसरातील चंदन इस्टेट जवळ नेवून सोडले.

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पिडीतेच्या फिर्यादीवरुन गुन्ह्यची नोंद केली असून पुढील कारवाई पोलीस नाईक सिनारे हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post