वृद्ध महिलेस न सांभाळणार्या मुलगी व जावायाविरुद्ध गुन्हा दाखल
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- एकाहत्तर वर्षिय वृद्धेचा तिची मुलगी व जावायाने परित्याग करुन घरातून हाकलून दिले. तसेच जावायाने दारु पिऊन हाताने मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना मागील चार वर्षांपासून वारंवार होत आहे. नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर येथे घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीमती ताराबाई अरुण कडव (वय 71, रा.मोहटादेवी मंदिराजवळ, कल्याण रोड, शिवाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वृद्धपकाळात त्यांना कोणाचाही आधार नसल्याने त्यांनी त्यांची मुलगी विणा बाळू विधाते व जावई बाळू विधाते यांना त्यांच्या घरी राहण्यास सांगितले. मुलगी व जावाई यांनी काही दिवस त्यांचा उत्तम सांभाळ केला परंतु मागील चार वर्षांपासून मुलगी व जावाई हे त्यांचे कुठल्याही प्रकारचे संरक्षण करीत नाही. तसेच त्यांना त्यांच्या घरात राहून देत नाही. जावई बाळू विधाते हा दारू पिऊन येवून कडव यांना मारहाण करुन शिवीगाळ करतो तर मुलगी विणा ही देखील तिच्या आईस शिवीगाळ करुन दमदाटी करते.
या प्रकरणी कोतवाली पोलीसांनी श्रीमती लताबाई कडव यांच्या फिर्यादीवरुन आई-वडीलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 चे कलम 24 व भारतीय दंड विधान कलम 323, 504, 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून पुढील कारवाई पोलीस हवालदार आर. आर. औटी करीत आहेत.
Post a Comment