शिवाजी महाराज हे युगपुरुषोत्तम राजे होते - भाऊ कोरगावकर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एवढे भव्य आहे की, ज्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच. ते एकाच वेळी द्रष्टे, स्वातंत्र्ययोद्धे, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, युगपुरुषोत्तम होते. त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे, तर आताच्याही कित्येक शतकांत तोड नाही. असा हा राजा केवळ पुण्यवंत राजाच नव्हता, तर तो आदर्श नितिवंत राजे होते. आज महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आहे आणि शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे काम करत आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून होत आहे. शेतकर्यांची कर्जमाफी, युवकांचा रोजगाराचा प्रश्न, महिलांची सुरक्षिता यास प्राधान्य देत आहे. त्याच बरोबर शिवभोजनासारखा महत्वकांक्षी उपक्रम राबवून गरीबांना फक्त 10 रुपयांमध्ये शिवथाळी उपलब्ध करुन दिली आहे. अशाप्रकारे सर्वसामान्यांचे सरकार म्हणून काम सुरु असल्याचे प्रतिपादन शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी केले.
माळीवाडा शिवसेना शाखेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त भव्य देखावा उभारण्यात आला आहे. सुरुवातीला शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अॅड.अभय आगरकर, ज्येष्ठ नेते श्रीराम येंडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, संजय शेंडगे, दत्ता कावरे, अनिल बोरुडे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, संग्राम शेळके, हर्षवर्धन कोतकर, शिवाजी कदम, विनोद ताठे, प्रविण बेद्रे, दिपक पवार, दयानंद वाबळे, शेखर आढाव, रवी वडे, निंबाळकर, निघोजकर आदि उपस्थित होते.
यावेळी संभाजी कदम म्हणाले, शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणाच्या अनेक सुविधा पुरविल्या, पैसा योग्य कामासाठी वापरला. राजांच्या इतिहासातील आदर्श आचार, विचार, संस्कार युवा पिढीत निर्माण व्हावेत. त्यांचा आदर्श आजच्या युवकांनी घ्यावा. समाजातील दृष्टप्रवृत्तीचा नाश करुन समाज हितासाठी काम करावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी अॅड.अभय आगरकर, श्रीराम येंडे, सुरेखा कदम, अनिल शिंदे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
Post a Comment