अबब! माचीस बॉक्स वाहतूक करणारा चालता ट्रक पेटला


अग्नीशमन दलाच्या परिश्रमाने आग विझवण्यात यश
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : नगर - सोलापूर बायपास जवळ अरगणगाव शिवारात आगपेटीची वाहतुक करणार्‍या ट्रकला आग लागली, सदरची आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन दलाच्या पथकाने परिश्रम घेतले.

नगर - सोलापूर महामार्गावर आगपेटीची वाहतुक करणार्‍या ट्रक क्र. टीएन 37 ई 4266 ने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. यानंतर येथील नागरीकांनी येथील अग्निशलन दलाच्या पथकाला ही माहिती दिली. अग्निशमन दलाच्या पथकाने या ठिकाणी जावून ही आग अटोक्यात आणली. आगीमध्ये ट्रकमधील माल पुर्णपणे भस्मसाद झाला. यातील लाखो रुपयांच्या अगपेट्या जळुन खाक झाल्या आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग आटोक्यात आनल्याने पुढील अनर्थ टळला. आगीचे निश्‍चित कारण समजले नाही. या आगीच्या तांडवामुळे बाह्यवळन रस्त्यावरील वाहतुक बर्‍याच वेळ ठप्प झाली होती.

अग्निशमन पथकातील शाकीर रंगारी, नाना सोलट, भरत पडगे, सोमनाथ गायकवाड यांनी अग्निशमन वाहनामधुन तीन ट्रीपा करुन ही आग अटोक्यात आनली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post