खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांची ओपीडी हाउसफुल


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- अहमदनगर दक्षिण मतदार संघासाठी विविध विभागांच्या बैठका आटोपल्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज आपल्या नूतन कार्यालयांमध्ये मतदारसंघातील नागरिकांसाठी भेटीगाठी घेतल्या यावेळी नागरिकांना आपल्या समस्या साठी खासदारांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, भाजप शहराध्यक्ष भैय्या गंधे, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड , माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक पै, सुभाष लोंढे ,नगरसेवक निखिल वारे, मा.नगरसेवक धनंजय जाधव तसेच शहर व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस नागरिकांनी केंद्रीय विद्यालय प्रवेश, पंतप्रधान सहाय्यता निधी, रेल्वे रस्ते संबंधित निवेदने दिली खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून सूचना करून नागरिकांची कामे मार्गी लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केली

नगर शहार व तालुक्यातील नागरिकांचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी व त्याची सोडवणूक व्हावी म्हणून खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते, यावेळी नगर शहातील नागरिकांनी आपले विविध प्रश्न खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्यासमोर मांडले ते प्रश्न जाणून घेऊन त्याची सोडवणूक लवकारात लवकर करण्याचे आवश्वसन दिले.

खासदार डॉ. विखे म्हणाले की प्रत्येक जनता दरबारमध्ये नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी उपस्थित राहिले पाहिजे हा केवळ देखावा नाही यामधून नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देवून काम केले पहिजेन, नगर शहारातील नुतन कार्यालयात अशाच पध्दतीने नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post