मुख्यमंत्र्यांनी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी




माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीसह रश्मी ठाकरे सामनाच्या पहिल्या महिला संपादक बनल्याआहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी ‘सामना’ दैनिकाचे संपादकपद सोडले होतं. रश्मी ठाकरे यांच्या निवडीनंतर या पदावर ठाकरे कुटुंबातीलच व्यक्ती असणार हे आता स्पष्ट झाले आहे.

सामनातून वेळोवेळी शिवसेना आपल्या भूमिका मांडली आली आहे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 23 जानेवारी 1988 रोजी सामना दैनिकाची सुरुवात केली होती. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना वेळोवेळी आपल्या भूमिका मांडत आली आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना 'सामनाचे संस्थापक संपादक' असे पद बहाल केले.

एकाचवेळी दोन पदांवर राहू शकत नसल्याचे सांगत उद्धव यांचा राजीनामा

शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे होती. मात्र एकाचवेळी दोन पदांवर राहू शकत नसल्याचे सांगत उद्धव यांनी सामनाचे संपादक सोडेल. त्यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकारी संपादक असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ची जबाबदारी पेलली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post