शेतकरी कर्जमाफी म्हणजे जखम गुडघ्याला अन् पट्टी डोक्याला : मंत्री बच्चू कडू


माय अहमदनगर वेब टीम
नागपूर -मुख्यमंत्री चांगले निर्णय घेत आहेत. मात्र, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा समस्येवरील उपाय नाहीच. कर्जमाफीचा निर्णय म्हणजे जखम गुडघ्याला अन् पट्टी डोक्याला असा हा प्रकार असल्याचे सांगत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला. कर्जमाफीच्या मुद्द्यावर कुठलाही बँक अधिकारी शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर त्याच्या कानफटात लगावणार, असा इशाराही त्यांनी नागपुरात दिला.

ते म्हणाले, शेतमालास हमीभाव हे या समस्येवरील प्रभावी उत्तर आहे. मोदींनी शेतकऱ्यांना ५०% नफा धरून हमीभावाची घोषणा केली. ती अमलात आलेली नाही. त्यामुळे आजही शेतकरी आहे, त्याच स्थितीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन या समस्येवर तोडगा काढला पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post