शिवम्हलार संघ नृसिंह चषकाचा मानकरी


- द्वितीय पारितोषिक संघर्ष तर तृतीय लोणी संघाने जिंकले
- एकूण ९० संघाने नोंदविला सहभाग
- राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यातील भातोडी (पारगाव) येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रथम पारितोषिक नगर च्या शिवम्हलार संघाने तर द्वितीय संघर्ष क्रिकेट क्लब भातोडी व तृतीय लोणी ( ता. आष्टी ) या संघाने पटकाविले आहे. उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रवीण लबडे यांची निवड करण्यात आली. तर शिस्तप्रिय संघ म्हणून फ्रेंड्स ग्रुप संघाची निवड झाली.

पारितोषिक वितरण नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि. शंकरसिंग रजपूत व नगर पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

सपोनि रजपूत, प्रवीण कोकाटे, बबनराव घोलप व निसार शेख यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रथम पारितोषिक- रू.१५५५५, द्वितीय- रू.१११११ व तृतीय रू.७७७७ असे अनुक्रमे तीन बक्षिसे ठेवण्यात आली होती. राज्यातील एकूण ९० संघाने सहभाग नोंदवला.

पारितोषिक वितरण प्रसंगी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ कदम, माजी सरपंच बबनराव घोलप, नृसिंह कृषी सेवा केंद्राचे प्रमुख तथा माजी कृषी अधिकारी रावसाहेब आघाव, युवा उद्योजक अशोक तरटे, उपसरपंच राजु पटेल, शिवसेना तालुका उपप्रमुख निसार शेख, आशिर्वाद हॉटेलचे मालक सुनील थोरात, सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष रफिक पटेल, पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष हारूण शेख, उपाध्यक्ष रामदास बागडे, गुलाब लबडे, मधुकर अरणकल्ले, संयोजक टीमचे प्रतिनिधी प्रवीण लबडे, आदिनाथ शिंदे, दत्ता कदम, राजू काळे, शिवाजी लबडे, साहिर पटेल, सिराज पटेल, विलास लबडे, पिंटू लबडे, शरद घोरपडे यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

तसेच गावातील ग्रामपंचायतचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य, तसेच सेवा सहकारी सोसायटीचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व गावातील सर्व तरूण मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post