अखेर अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करार


माय अहमदनगर वेब टीम
दोहा : अखेर अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता करार करण्यात आला. कतारची राजधानी दोहामध्ये या शांतता कराराव स्वाक्षरी करण्यात आली. अफगाणिस्तानात २००१पासून सुरू असणाऱ्या अमेरिकेच्या हस्तक्षेपातील महत्त्वाचा टप्पा आहे. अखेर तब्बल १८ वर्षानंतर अफगाणिस्तानमधून अमेरिका आपल्या सैन्याला माघारी बोलवणार आहे.

अमेरिका आणि तालिबान यांच्यातील शांतता चर्चा फलद्रुप होण्याच्या मार्गावर होता. अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आणि तालिबानकडून हिंसाचारमुक्त आठवडा पाळण्यात आला. अमेरिकेच्या दृष्टीने हा करार ऐतिहासिक आहे. या करारानुसार आता अमेरिका आगामी १४ महिन्यांत अफगाणिस्तानमधून आपले सर्व सैन्य माघारी बोलवणार आहे. या करारानुसार, अमेरिका व मित्र राष्ट्रांच्या सुरक्षितेला धोका निर्माण होईल असे कृत्य कोणतीही व्यक्ती, संघटना अफगाणिस्तानमधून करणार नाही. अमेरिका व इतर देश अफगाणिस्तानमधून सर्व सैन्य माघारी बोलवतील, आदी महत्त्वाच्या गोष्टीवर सहमती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तान सरकार, तालिबान आणि अन्य गटांच्या प्रतिनिधींसोबत नॉर्वेत १० मार्चपर्यंत बैठक होणार आहे.

दरम्यान, शांतता कराराच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेतील २४पेक्षा जास्त लोकप्रतिनिधींनी परराष्ट्रमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांना पत्र लिहिले. पारदर्शकता आणि अमेरिकेला सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे या पत्रात म्हटले आहे. तालिबानबरोबरील सुरक्षेविषयक हमीही जाहीर करण्यात याव्यात. गुप्तचरांच्या माहितीची देवाण-घेवाण किंवा संयुक्त दहशतवादविरोधी केंद्राची स्थापन करण्यात येऊ नये, असेही या लोकप्रतिनिधींनी निक्षून सांगितले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post