‘कमिना’ म्हणत पत्रकाराने केला रणवीरचा अपमान


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत ठरत असलेल्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाता ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅक्शन सीनचा भरणा करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा ट्रेलर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि अजय देवगण झळकणार आहेत. त्यामुळे सध्या हे तिघंही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. यावेळी एका पत्रकाराने रणवीरला विचारलेला प्रश्न ऐकून अक्षय कुमार संतापल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर ‘तुम्ही असा प्रश्न विचारु शकत नाही’, असं अक्षयने यावेळी सांगितलं.

अक्षय,अजय आणि रणवीर पत्रकारांशी गप्पा मारत असताना एका पत्रकाराने “रणवीर तू या इंडस्ट्रीमधला सगळ्यात मोठा कमिना आहेस”, असं तुला वाटतं का? असा प्रश्न एका रिपोर्टरने रणवीरला विचारला. त्याचा हा प्रश्न ऐकल्यानंतर अक्षय कुमार संतापल्याचं पाहायला मिळालं. “तुम्ही फार चुकीचं बोलत आहात. हा केवळ चित्रपटातील संवाद आहे. प्रत्यक्षात तसं नाहीये. तुम्ही दोन्ही गोष्टींचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करु नका. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही असे प्रश्न विचारु नका”, असं अक्षय म्हणाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post