'त्या' मारहाण प्रकरणाची उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यामार्फत चौकशी - गृहमंत्री देशमुख


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : अहमदनगर येथे महिला व तिच्या पतीला मारहाणीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत आणि एकदंरीतच या प्रकरणाबाबत भारतीय पोलीस सेवेतील महिला अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला होता. त्यावर निवेदन करताना गृहमंत्री बोलत होते. ते म्हणाले, 24 फेब्रुवारीला ही घटना झाली असून त्यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या जोडप्याला त्या महिलेचे वडील, भाऊ, चुलत भाऊ, दीर मारहाण करण्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात संशयितांमध्ये कुटुंबातील सदस्य असून यातील तथ्य शोधण्यासाठी उच्चस्तरीय महिला अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post