नगरसेवक सुभाष लोंढे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा खोटा ; गुन्हा मागे घ्या- शिवसेनेची एसपिंकडे मागणी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शिवसेनेचे नगरसेवक सुभाष लोंढे यांच्यावर खोटा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्यांना केवळ राजकीय द्वेष मनात ठेवून या गुन्ह्यात आरोपी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा तातडीने मागे घ्यावा अशी मागणी नगर शहर शिवसेना व नगरसेवकांनी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, नगरसेवक अनिल शिंदे, संभाजी कदम, संजय शेंडगे, अँड.धनंजय जाधव, संतोष गेयनआप्पा, श्याम नळकांडे, सतीश घाडगे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, अभिषेक कळमकर, गणेश कवडे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा पोलीस अधीक्षक यान दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरसेवक सुभाष लोंढे यांच्यासह काही जणांवर कोतवाली पोलिसांना खोटा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हयामध्ये फिर्याद देणारे व सुभाष लोंढे यांचा कोणताही संबंध नसताना केवळ महेश अशोक चव्हाण हे त्यांचे मित्र आहे. त्यामुळे राजकिय द्वेषातुन

लोंढे यांचे नाव या गुन्हात गोवण्यात आलेले आहे. त्या घटनेच्या वेळी नगरसेवक लोंढे हे त्यांचे कल्याण रोड येथील हॉटेल दिनेश येथे कामकाज करत होते. ती घटना केव्हा घडली याबाबत त्यांना कोणतीही माहिती नव्हती. फक्त राजकीय द्वेषातुन विनाकारण सदरच्या गुन्हयामध्ये त्यांचे नाव गोवण्यात आलेले आहे. त्यादरम्यान हॉटेल समोर पोलिस पेट्रोलिंग व्हॅन चाललेली होती. त्यावेळी लोंढे यांचेशी त्यांनी सुमारे १५ - २०मिनीटे चर्चा देखील

केलेली होती. हॉटेलमध्ये असलेले सीसीटीव्हीमध्ये सर्व घटना काय झाले आहे वास्तविक पाहता ते घटनास्थळी नव्हते हे निदर्शनास येते लोंढे यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा केवळ राजकीय हेतूने दाखल झाल्याचा आहे त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हा तातडीने मागे घ्यावा. केवळ सुभाष लोंढे हे प्रतिष्ठीत व्यक्ती व २० वर्षापासुन नगरसेवक असल्याने व राजकीय स्तरावर त्यांचे कामकाज चांगले असल्याने राजकीय द्वेषाने प्रेरीत होऊन त्यांचे नाव बदनाम करण्यासाठी व त्यांना नाहक त्रास व्हावा या दृष्ट हेतुने सदरच्या गुन्हामध्ये त्यांचे नाव गोवण्यात आलेले आहे . यापुर्वी देखील अशाच प्रकारे त्यांना बदनाम करण्याच्या व त्रास देण्याचे हेतुने त्यांना खोटया गुन्हयामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला होता . परंतु त्याबाबत योग्य ती शहानिशा झाल्यानंतर व त्यांचा कोणताही संबंध नसताना देखील त्यांचे नाव गोवण्यात आल्याने संबंधीत व्यक्तींनी त्यांचा गुन्हाशी संबंध नसताना त्यांचे नाव विनाकारण नोंदविले असल्याचे प्रतिज्ञापत्र देखील संबंधीत कार्यालयास सादर केलेले आहे . लोंढे यांचा सदर गुन्हयाशीही कोणताही दुरान्वये संबंध नसतानाही याही गुन्हयामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न चालवलेला असुन त्यांचे विरुध्द खोटा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे . लोंढे हे निर्दोष असुन त्यांना बदनाम करण्यासाठी खोटा गुन्हा त्यांचे विरुध्द दाखल झालेला असल्याने सदरच्या गुन्हयातुन त्यांचे नाव वगळण्यात यावे . विनाकारण खोटया व तथाकथीत माहितीच्या आधारे त्यांचे नाव गुन्हयामध्ये गोवण्यात येऊ नये. त्यामुळे लोंढे यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा तातडीने मागे घ्यावा अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post