हस्तांदोलनाऐवजी नमस्ते करा व गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळावे : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- देशात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव दिसून आला असून 28 रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरचा आरोग्य विभाग सज्ज झाला असून जिल्हा रुग्णालय व बूथ हॉस्पिटल येथे 40 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना होवूच नये म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच नागरिकांनी दक्षता म्हणून हस्तांदोलन टाळावे व नमस्ते म्हणावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणांची बैठक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेतली. कोरोनाशी लढा देण्यासाठी यंत्रणा किती सज्ज आहे, याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. परदेशातून भारतात येणा-याच नागरिकांची विमानतळावरच तपासणी केली जात आहे. नागरिकांसाठी कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. टोल फ्री 104 क्रमांक कोरोना विषयक शंकासमाधानासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0241 – 2431018 असून हा कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे. शिर्डी, शनि शिंगणापूर या ठिकाणी दक्षता घेतली जात आहे. प्रत्येक नागरिकाने लगेचच मास्क वापरण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना विषाणू आराजाची लक्षणे ही मुख्यत्वे श्वासन संस्थेशी निगडीत असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास, घ्यायला त्रास होणे, निमोनिया, काही वेळा मुत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात.
सोशल मिडियावरील अफवा पसरवू नका
सोशल मिडियावर करोना संदर्भात विविध अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भिती उत्पन्न करणारे संदेश फिरताना दिसत आहेत. असे कोणतेही संदेश हे अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करुन घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप मुरंबीकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी जनतेस केले आहे.
कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी
श्वसनसंस्थेचे विकार असणार्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे. हात नियतिपणे साबणाने स्वच्छ धुवावेत, शिंकताना, खोकताना नाका तोंडावर रुाल अथवा टिश्यू पेपर धरणे, अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये, फळे व भाज्या न धूता खाऊ नयेत, हस्तांदोलन टाळावे, चेहरा, नाक यांना वारंवार हाताने स्पर्श करु नये. गरज नसताना गर्दीचे ठिकाणी जाणे टाळा. स्वत: उपचार करु नये, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावा. लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधून उपचार/ तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment