इंदूर-भोपाळ येथे होणारा आयफा पुरस्कार सोहळा लांबणीवर


माय अहमदनगर वेब टीम
मुंबईः जगभरातील बहुतेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण पाहता मध्य प्रदेशात होणारा आयफा पुरस्कार 2020 पुढे ढकलण्यात आला आहे. शुक्रवारी आयोजकांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की लवकरच नव्या तारखांची घोषणा केली जाईल.

जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "COVID - 19 विषाणूविषयीची वाढती चिंता आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचे आणि आरोग्यास लक्षात घेऊन आयफा मॅनेजमेंट आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी मध्य प्रदेश सरकारशी चर्चा केल्यानंतर हा सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च 2020 च्या शेवटी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता."

मध्य प्रदेशलाच मिळणार पाहुणचाराचा मान
आयोजकांनी म्हटले की, "मध्य प्रदेशात होणार्‍या या पुरस्कारांच्या नवीन तारखा व योजना लवकरच जाहीर केल्या जातील. आयफाच्या जादूचा अनुभव घेण्यासाठी जगभरातून आलेल्या सर्व चाहत्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आयफा पूर्णपणे वचनबद्ध आहे. आपल्‍याला होणार्‍या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही आशा करतो की सर्व संबंधित लोक परिस्थितीची संवेदनशीलता समजून घेतील."

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post