शेततळ्यात बुडून शाळकरी मुलीचा मृत्यू


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - घराशेजारील शेततळ्यात बुडून ११ वर्षिय शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे शुक‘वारी (दि.६ ) दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

ऋतुजा अमोल कोकाटे (इयत्ता ५ वी) असे या मयत झालेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे. ती चिचोंडी पाटीलचे माजी सरपंच अमोल कोकाटे यांची कन्या आहे. कोकाटे हे भातोडी रस्त्यालगत असलेल्या मारुतीवाडी परिसरातील कोकाटे वस्तीवर राहतात. त्यांच्या घरासमोरच शेततळे करण्यात आलेले आहे. ऋतुजा ही दुपारी शाळेतून घरी आल्यावर घरासमोर खेळत होती. ती शेततळ्यावर गेली असता पाय घसरुन शेततळ्यात पडली. जवळपास कोणी नसल्याने आणि तिला पोहोता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे चिचोंडी पाटील परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post