बनावट दस्तऐवजाद्वारे प्लॉटची परस्पर विक्री करुन फसवणूक


केडगाव येथील घटना; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- प्लॉटच्या मूळ मालकाऐवजी तोतया इसम व महिला उभी करुन बनावट दस्तऐवजाच्या साहायाने प्लॉटची परस्पर विक्री करुन फसवणूक केल्याची घटना दि.4 मार्च 2017 व 2 मे 2017 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, अहमदनगर येथे घडली.

याबाबत शरद बाबूराव झोटींग (वय 53, रा.रामकृष्ण कॉलनी, गुलमोहोररोड, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, श्रीनिवास श्रीकांत दामले व मयत इंदूबाई श्रीकांत दामले यांच्या नावाने केडगाव येथील बिगर शेती प्लॉट (सर्व्हे नं.207/1 क, प्लॉट नं.25, 342 चौ.मी. व सर्व्हे नं.207/1क, प्लॉट नं.18, 365 चौ.मी.) यांच्या नावाने असून ते प्लॉटचे मूळ मालक आहेत. त्यातील इंदूबाई दामले या मयत आहेत.

या प्लॉट प्रकरणी आरिफ इकबाल शेख (रा. नॅशनल कॉलनी, मुकुंदनगर), इलियास लतिफ शेख (वय 24, रा.सारसनगर, मार्केटयार्ड मागे), साजिद हसन शेख (वय 27, रा.मुकुंदनगर), सय्यद फारुक हमीद (रा.मुकुंदनगर), सचिन संजय उमाप (रा.सर्जेपुरा), मंजूर रफिक सय्यद, जिशान नजिर खान (रा.मुकुंदनगर) व पूनम श्रीकांत दामले (रा.बोल्हेगाव) यांनी श्रीनिवास दामले व इंदूबाई दामले यांच्या ऐवजी तोतया इसम व तोतया महिला उभी करुन बनावट दस्तावेजाच्या साहाय्याने खरेदीखत (दस्त क्र.928/217) व खरेदीखत (दस्त क्र.2056/2017) अन्वये नोंदवून दोन्ही प्लॉटची परस्पर विक्री करुन फसवणूक केली अशी फिर्यादी दिली.

या प्रकरणी शरद झोटिंग यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 419, 420, 465, 468, 470, 471, 34 सह नोंदणी अधिनियम 2008 चे कलम 83 प्रमाणे फसवणूकीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विकास वाघ हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post