डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयला मोठ यश ; ते पिस्तुल समुद्रात सापडले


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई – अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयला मोठ यश मिळाले आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तुल सीबीआयच्या हाती लागले आहे. हत्याकरून अरबी समुद्रात फेकलेले पिस्तुल सीबीआयने शोधून काढले आहे. पुण्यात 2013 साली डॉ.नरेंद्र दाभोलकरांची मॉर्निंग वॉकला गेले असता अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढले. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी ही माहिती दिली आहे.

ठाण्याजवळच्या खारेगाव खाडीतून हत्येचे पिस्तुल शोधून काढण्यात आले आहे. सीबीआयने हे पिस्तुल तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळा अर्थात फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post