25 वर्षांनंतर तपोवन रस्त्याचे ग्रहण अखेर सुटणार – आ.संग्राम जगताप


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी रस्त्याची कामे होणे गरजेचे आहे. शहरातील डीपी व प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी मोठा निधी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मागील पाच वर्षामध्ये तपोवन रस्त्यासाठी मुख्यामंत्री ग्राम सडक योजनेतून साडेतीन कोटी रूपये मंजूर करून आणले होते. आज या रस्त्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. अखेर 25 वर्षांनी तपोवन रस्त्याचे ग्रहण सुटणार आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून तपोवन रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे साडेतीन कोटी रूपये मंजूर झालेले आहेत. या रस्त्याच्या कामाची पाहणी आ. जगताप यांनी केली. यावेळी विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक निखिल वारे, विनीत पाउलबुद्धे, बाळासाहेब पवार, सुनील त्रिंबके, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण, विजय गव्हाळे, आरिफ शेख, सुमित कुलकर्णी, अॅड. प्रसन्न जोशी, गजेंद्र भांडवलकर, प्रशांत निमसे आदी उपस्थित होते.

सावेडी उपनगरातील प्रमुख मानला जाणारा तपोवन रस्ता हा स्थानिक प्लॉट धारकाच्या वादामुळे रहदारीस बंद होता आणि त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी निधी देखील मिळत नव्हता परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून रस्ता वाहतुकीस खुला करून आणि रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करून देण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत होते. आ.संग्राम जगताप यांनी बारकाईने अभ्यास करून सर्वप्रथम लक्ष्मीनगर सोसायटीच्या सहकार्याने तपोवन रस्ता वाहतुकीस खुला केला आणि आमदारांना मिळणार्‍या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून सुमारे 3.5 कोटी रुपयांची तरतूद करून आणली आणि रस्त्याचे काम सुरू केले आज सद्यस्थितीत रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाले असून लवकरच अंतिम लेयरचे काम देखील सुरू होणार आहे. या सर्व कामामुळे तपोवन रस्ता परिसरातील सुमारे 50 हजार लोकांचा दळण वळणाचा प्रश्न मिटणार आहे. पाईपलाईन रोडवरील वाहतूक आता तपोवन वरून जावू शकते. पाईपलाईन रोडला पर्याय रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. औरंगाबाद व मनमाड महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता आहे, असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post