कोरोनाचा महाराष्ट्रात शिरकाव ; पुण्यात कोरोना व्हायरसचे २ रुग्ण


माय अहमदनगर वेब टीम
पुणे/नवी दिल्ली - देशात कोराेनाचा संसर्ग वाढत चालला आहे. सोमवारी भारतात ५ प्रकरणे समोर आली. महाराष्ट्रात प्रथमच रुग्ण आढळले आहेत. पुण्यात दुबईहून परतलेल्या दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एक महिला व एका पुरुषाचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पुणे मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे यांनी साेमवारी दिली.

सोमवारी दिल्ली, उत्तर प्रदेश, केरळात कोरोनाचे रुग्ण आढळले. केरळात ३ वर्षांच्या चिमुकल्यासही लागण झाली. आता देशातील रुग्णांची संख्या ४५ वर गेली आहे. केंद्राने विदेशी जहाजांना ३१ मार्चपर्यंत देशातील बंदरांवर थांबण्यास मनाई केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post