अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे 100 वे नाटय संमेलन अहमदनगरमध्ये
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे 100 वे नाटय संमेलन महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यात होणार असून नगर येथे 1 ते 3 मे 2020 या कालावधीत नाटय संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे अध्यक्ष प्रसाद कांबळी व प्रमुख कार्यवाह अभिनेते शरद पोंक्षे यांनी नगरमध्ये पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नाट्य शाखेचे जिल्हा अध्यक्ष अमोल खोले, सहकार्यवाह सतीश लोटके, नियामक मंडळ सदस्य दिगंबर प्रभू, अशोक नारकर, सतीश शिंगटे, प्रवक्ता संजय घुगे नगर शाखेचे उपाध्यक्ष शशिकांत नजान, प्रा. श्याम शिंदे, खजिनदार तुषार चोरडिया, सहकार्यवाह- अविनाश कराळे, अभिजीत दरेकर, सुनील राऊत, संघटक – पुरुषोत्तम (विलास) कुलकर्णी, संजय लोळगे, प्रा.शुभांगी कुंभार, सतीश काळे, डॉ. राजेंद्र साबळे, शिवचरण शिवाजी, प्रा. योगेश विलायते, जालिंदर शिंदे, विशाल कडुसकर आदी पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि संमेलन समन्वयक क्षितिज झावरे, नाट्यकर्मी सदानंद भणगे, पी.डी.कुलकर्णी, अनंत जोशी, प्रसाद बेडेकर, संजय आढाव, प्रसाद भणगे, चंद्रकांत सैंदाने, संदीप रसाळ, सौ.उर्मिला लोटके, बाळकृष्ण जगताप उपस्थित होते.
नाटय संमेलनाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील तालुका स्तरावर नाट्य जागर उपक्रम राबविण्यात येणार आहे. चार व्यावसायिक नाटके, नृत्य, नाटय, लोककला, संगीत, नाट्य दिंडी यासह विविध कलांचे सर्वोत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष खा.शरद पवार आणि संमेलनाध्यक्ष जेष्ठ नाटककार, दिग्दर्शक जब्बार पटेल आहेत.
स्वागत व प्रास्ताविक प्रवक्ता संजय घुगे यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यातील सांस्कृतिक नियोजना बाबत सतीश लोटके, अमोल खोले यांनी माहिती दिली.
Post a Comment