सीबीएसईच्या 10वी-12वीसह जेईई परीक्षाही 31 मार्चपर्यंत स्थगित, आज रात्री 8 वाजता मोदींचा संदेश




माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली/मुंबई - कोरोना व्हायरसची बाधा रोखण्यासाठी देशात आता युद्धपातळीवर तयारी सुरू झाली आहे. सीबीएसईने १९ मार्चपासून ३१ मार्चदरम्यान होणाऱ्या १०वी व १२वीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. जेईई मेनन्स व सर्व विद्यापीठांच्या परीक्षाही स्थगित केल्या असून सीबीएसईमध्ये १०वीचे १८ लाख व १२वीचे १२ लाख विद्यार्थी आहेत. तर, जेईई मेन्ससाठी ११ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. दुसरीकडे सरकारी कार्यालयेही बंद केली जात आहेत.

रिलायन्सने सर्व २ लाख कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत घरूनच काम करण्यास सांगितले आहे. देशातील या स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी राष्ट्राला उद्देशून भाषण करतील. सूत्रांनुसार, दिल्ली सरकारची आरोग्य व वाहतूक वगळता इतर कार्यालये काही दिवस बंद ठेवली जाणार आहेत.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post