स्टेशन रोड, माळीवाडा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ


लाखो रुपयांचा ऐवज लांबवला, कोतवालीत गुन्हा दाखल
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - स्टेशन रस्ता व माळीवाडा परिसरातील पाच ते सहा दुकाने चोरट्यांनी फोडली. यात लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, स्टेशन रोड परिसरातील दुकाने पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडले. दुकानातून वीस ते पंचवीस हजारांचा ऐवज चोरीस गेला. त्यानंतर परिसरातील इतरही काही दुकाने चोरट्यांनी फोडली. माळीवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता परिसरातील दोन-तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. यात रोख रक्कम व दुकानातील साहित्य असा एकूण लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके पोलिस निरीक्षक विकास वाघ आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post