चौदा लाखांसह एटीएम मशीन पळविलेमाय अहमदनगर वेब टीम
धुळे : तालुक्यातील शिरुड येथुन अज्ञात चार कुख्या चोरटयांनी चक्क १४ लाख ७ हजार, ५०० रुपयांच्या रोकडसह एटीएम पळवुन नेले. दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. या चोरटयांना जेरबंद करण्याचे कडवे आव्हान हे पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

शिरुड ता. धुळे येथे सेंट्रल बॅकेचे एटीएम आहे. या एटीएम समोरच दुसNया बॅकेचे देखील एटीएम आहे. दि. २९ पेâब्रुवारी रोजी पहाटे २.१९ वाजेच्या सुमारास चार अज्ञात चोरटे येथे दाखल झाले. त्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने एटीएम मशिन बाहेर खेचले. चोरीच्या पीकअप व्हॅनमध्ये एटीएम टाकुन या चौघांनी येथुन पोबारा केला. या एटीएम मशिनमध्ये १४ लाख ७ हजार ५०० रुपयांची रोकड होती. सीसीटीव्हीत आपण वैâद होवु नये यासाठी चौघांनी टोप्या घातलेल्या होत्या. हे चोरटे २५ ते ३५ वयोगटातील आहेत. त्यांनी आयडी क्रमांक एम. ०३ सी. १६६६११ क्रमांकाचे सेंट्रल बॅकेचे एटीएम लांबवुन नेले आहे. या चौघांनी एटीएम असलेल्या खोलीच्या दरवाज्याची देखील काच फोडली आहे. एटीएम मशिन खेचत असतांना एटीएम मशिनचे देखील नुकसान झाले. यासंदर्भात पहाटे २.४० वाजेच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्ष, धुळे तालुका पोलीस स्टेशन यांना माहिती मिळाली.
माहिती मिळताच एपीआय कोडापे हे घटनास्थळी दाखल झाले. नुतन जिल्हा पोलीस अधिक्षक पदी पंडित चिन्मय हे येथे रुजु झाल्या बरोबर चोरटयांनी त्यांना चांगलीच चपराक दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. राजु भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, एलीसीबीचे पीआय शिवाजी बुधवंत, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, पी.एस. आय. सुकदेव भोरकडे, पी.एस. आय. गजानन गोेटे हे दाखल झाले. पोलिसांनी या चोरटयांना जखडण्यासाठी नाका बंदी करण्याचे आदेश दिले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post