26 वर्ष जनतेला हसवले आता माझ्यावर रडण्याची वेळ- इंदोरीकर महाराज
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : तंदरूस्त जीवन जगवण्यासाठी हसणे महत्वाचे आहे. त्या साठीच आज पर्यंत 26 वर्ष कीर्तन सेवेच्या माध्यमातून जनतेला हसवत आलो. पण आज मला रडावे लागतय अशी खंत ह भ प निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ यांच्या मातु:श्री स्व सोनाबाई माणिकराव गुंजाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, राहुल जगताप, साहेबराव दरेकर, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा शशीकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार, जिल्हा बैंकेचे माजी उपाध्यक्ष संपतराव म्हस्के, काँग्रेसचे जेष्ठ नेते बन्सीभाऊ म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे, भाजपा चे तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे बाजार समितिचे आजी माजी संचालक व विविघ मान्यवर उपस्थित होते.

इंदोरीकर म्हणाले, निसर्ग नियमानुसार अनेक बाबी सत्य व निश्चित आहेत. पण ज्या लोकांचा देवावर आणि ग्रंथावर विश्वास नाही, त्यांना हे अमान्य आहे. पण त्याला कोण काय करणार. निसर्ग नियमाच्या विरोधात माणूस जगू शकत नाही. नद्यांचे प्रदूषण हा गंभीर विषय बनत चालला आहे. माझं एक सांगणं आहे की, अंत्यविधीनंतर अनेक जण रक्षा नदीत टाकतात, त्याने प्रदूषणात भरच पडते,जर ती रक्षा शेतात टाकली तर नदी प्रदूषण रोखण्यासाठी आपण हातभार लावू शकतो, असे ते म्हणाले.

कीर्तनासाठी बीड व अहमदनगर जिल्ह्यातील प्रंचड जनसमुदाय उपस्थित होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post