'या' कारणाने जामखेडच्या आठवडे बाजारात झाला गोळीबार


वैयक्तिक वादातून घडला प्रकार
अहमदनगर - जामखेड येथील आठवडी बाजारात हवेत गोळीबार करून युवकाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वैयक्तीक वादातून हा प्रकार घडला. आज सकाळी बीड रोड परिसरात ही घटना घडली. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात असले तरी नेमके कारण मात्र स्पष्ट आहे.

याबाबत माहिती अशी की, दोन युवकांच्या गटात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते आज आठवडे बाजाराच्या दिवशीही बीड रोडवर त्यांच्यात किरकोळ वाद झाले. त्या वादातून एकाने हवेत गोळीबार केला. गर्दीच्या ठिकाणी गोळीबार होताच परिसरात घबराट पसरली काहींनी धावपळ केली. गोळाबारानंतर वाद केलेले गट तेथून पसार झाले.

आठवडे बाजारात गोळीबाराची घटना कळताच शहरात घबराट पसरली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक संजय सातव हेही घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व जामखेड पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post