धक्कादायक : जामखेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार


अल्पवयीन मुलगी दिड महीन्यांची गर्भवती

माय अहमदनगर वेब टीम
जामखेड- दोन महीन्यांपुर्वी आजी आजोबांनकडे शेतात जात आसताना व घरात यातील आरोपीने मोटारसायकलवर येऊन भावाच्या मदतीने अत्याचार केला. या घटनेत अल्पवयीन मुलगी ही दिड महीन्यांची गर्भवती आसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीच्या भावासह दोन जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेप्रकरणी एक अल्पवयीन मुलगा तर दुसरा विजय उर्फ दादा पोपट घुगे (वय २१ वर्षे. रा. आनंदवाडी) अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील आनंदवाडी येथे एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आरोपी दादा पोपट घुगे याने दोन महीन्यांपुर्वी मुलीच्या घरी व त्या नंतर एक महीन्यांपुर्वी पिडीत अल्पवयीन मुलगी ही शेतात आपल्या आजी व आजोबांनकडे जात असताना यातील आरोपीने आपल्या भावाच्या मदतीने मोटारसायकलवर येऊन मुलीस बळजबरीने जवळील शेतात नेहुन बलात्कार केला. अशा प्रकारे आरोपीने आपल्या भावाच्या मदतीने पिडीत मुलीवर दोन वेळा अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या भावांना मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे भीतीपोटी मुलीने दोन महीने होऊनही हा प्रकार कोणाला सांगीतला नाही. या नंतर दि. ११ मार्च रोजी पिडीत मुलगी ही घरात रडत आसताना तीला आईन का रडते असे विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर मुलीस जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता सदर पिडीत अल्पवयीन मुलगी ही दिड महीन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या नंतर दि. १३ मार्च रोजी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीच्या भावासह दोन जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीसांनी यातील आरोपी विजय उर्फ दादा पोपट घुगे वय २१ वर्षे यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अवतारसिंग चव्हाण हे करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post