कोरोनामुळे वडगाव गुप्ता येथील दावल मलिक बाबा यात्रा उत्सव रद्द
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: - करोनो आजाराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील दावल मलिक बाबा यात्रा १७ व १८मार्च २०२० रोजी साजरी होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीचे सरपंच विजय शेवाळे यांनी दिली आहे.
वडगाव गुफ्ता ( ता. नगर ) येथील यात्रा तालुक्यात चांगलीच प्रसिद्ध आहे. शहराजवळील गाव तसेच गावातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या त्रा मोठया प्रमाणात भरत असते . खेळण्याचे , खाऊचे दुकाने तसेच ३तर व्यवसाईकांची गर्दो मोठ्या प्रमाणात होत असते . तसेच हजारो भाविक दर्शनाला येतात. करोना हा आजार संसर्गजन्य आजार आहे. आरोग्याच्या दुष्टीने घातक आहे .यात्रेमुळे गर्दीचे प्रमाण जास्त होत आहे.
लोकनाट्य तमाशा व जंगी हंगामा रद्द करण्यात आला आहे. वडगाव गुप्ता यात्रेसाठी एकत्रित जमू नये असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत कुठलीही जबाबदारी यात्रा कमिटी घेणार नाही असे यात्रा कमिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे
Post a Comment