कोरोना : राळेगणसिद्धी पाठोपाठ हिवरेबाजारमध्ये पर्यटकांना बंदी
हिवरे बाजार ग्रामस्थांचा निर्णय
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- सध्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. हिवरे बाजारमध्ये दररोज सर्वांगीण ग्रामविकासाची संकल्पना अनुभवण्यासाठी जगभरातून विविध क्षेत्रातील पर्यटक येत असतात. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे तो एकाकडून दुसर्याकडे जाण्याचा धोका मोठा आहे म्हणूनच खबरदारी म्हणून कोरोना आटोक्यात येत नाही तोपर्यंत हिवरे बाजारला भेट देण्याचे टाळावे असा आग्रह ग्रामस्थांनी केल्यामुळे हिवरे बाजार भेटीस पर्यटकांना मज्जाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
बंदीचा हा भाग काही काळासाठी असेल. पर्यटकांना प्रेमाचा व खबरदारीचा एक भाग म्हणून त्याचा कृपया कोणीही गैरसमज करून घेवू नये असे आवाहन सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले आहे. तसेच व्हायरसच्या साथीला धैर्याने तोंड देऊन साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही श्री.पवार यांनी केले.
Post a Comment