कोरोना बाबत अफवा पसरविने पडले महागात ; पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल


माय अहमदनगर वेब टीम
संगमनेर - संगमनेर शहरामध्ये कोरणा व्हायरस बाबत चुकीची माहिती व्हाट्सअप च्या माध्यमातून प्रसारित केल्या प्रकरणी शुुक्रवार दि 13 मार्च रोजी संगमनेर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे .

संगमनेर बस स्टॅंड मध्ये कोरोनाचा रूूूग्ण सापडला असुन त्याला त्वरीत तांबे हाॅस्पिटल येथे नेण्यात आले आहे तरि सर्वांना विनंती आहे की आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये व तोंडाला रुमाल अथवा मास्क लावावे असा संदेश बुलंद राजकारणी या व्हाटस् अॅप ग्रुपवर ज्योत्स्ना साळवी व सरोदे या दोन व्यक्तींनी अशा प्रकारचा संदेश अग्रेषित केला होता

वस्तु स्थितीची शहानिशा करता असे आढळून की वरील संदेश पुर्णपणे चुकीचा आहे . या संदेशामुळे सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन चुकीचा संदेश जातो मा तहसीलदार, मा गटविकास अधिकारी, मा, तालुका आरोग्य अधिकारी, मा नगराध्यक्षा यांचेशी वरील बाबतीत चर्चा केली असता हा प्रकार चुकीचा असुन

सदर अफवेमुळे जनसामान्य माणसांत भीतीचे वातावरण निर्माण होवु शकते असे आम्हां सर्वांचे मत आहे तरी वरील संदेश बाबत जबाबदार व्यक्तीवर योग्य ती कारवाई व्हावी सदर ग्रुपचे अॅडमीन रोहिणी गुंजाळ व नानासाहेब गुंजाळ हे असुन ग्रुप अॅडमिन या नात्याने यांच्या वर कारवाई करण्यात आली आहे

व्हाट्स् अॅप वर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये कोरोना बाबत माहिती शहानिशा केल्याशिवाय कोणीही माहिती प्रसारित करू नये असे आवाहन जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post