धक्कादायक : देशात 457 कोरोनाग्रस्त, महाराष्ट्रात 97 रुग्ण


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - देशात कोरोना व्हायरस संक्रमणच्या आतापर्यंत 460 केस आढळून आल्या असून 9लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासात 22 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 17 मुंबई, सांगलीत 4 आणि 1 पुण्यातील आहे. आता महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमित एकूण 97रुग्ण झाले आहेत.

आज (23 मार्च) पश्चिम बंगालमधील 57 वर्षीयकोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात 3, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, गुजरातमध्ये प्रत्येक एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.देशातीलकोरोनाबाधित मृतांचाआकडा 9 वर पोहोचला आहे.

केरळमध्ये सोमवारीएकाच दिवसात 28कोरोनाचे रुग्णसापडले. यासोबत येथीलकोरोनाग्रस्तांचा आकडा आता95 वर पोहोचला आहे. केरळमधीलरुग्णांत वाढ झाल्यानंतर31 मार्चपर्यंत राज्यात पूर्णपणे लॉकडाउन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.केरळमध्ये यापूर्वी 2018 मध्येनिपाह विषाणू मोठ्या प्रमाणावर पसरला होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post