शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान


माय अहमदनगर वेब टीम
मध्यप्रदेश - मध्य प्रदेशात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर भाजपानं अखेर आपलं सरकार स्थापन केलं आहे. भाजपाचे राज्यातील वरिष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी रात्री नऊ वाजता राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अवघ्या १८ महिन्यात ते पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत.

तत्पूर्वी, शिवराजसिंह चौहान यांना सोमवारी भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीत पर्यवेक्षक बनवण्यात आलेले भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मध्य प्रदेशचे प्रभारी विनय सहस्त्रबुद्धे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

दरम्यान, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला रामराम करीत भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या २२ समर्थकांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर २२ मार्च रोजी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर दुसरीकडे भाजपाची सदस्य संख्या वाढल्याने सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याने भाजपाचे सरकार बनणार हे निश्चित झाले होते. नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपालांनी कमलनाथ यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्र्याची जबाबदारी सोपवली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post