अवकाळी पावसाचा जिल्ह्याला तडाखा ; गहू, मका भुईसपाट, फळबागांचेही नुकसान


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील, वाळकी, खडकी, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद परिसरात वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारा पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एक मार्च रोजी झालेल्या अवकाळी गाराच्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. काढणीला आलेला कांदा, हरभरा, गहू ज्वारी तसेच फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चिचोंडी पाटील परिसरातील गहू भुईसपाट झाला आहे. यामुळे उंदीर, घुस हे गव्हाच्या ओंब्या खाऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. खडकी, बाबुर्डी परिसरात संत्रा फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
 हरभरा,कांदा पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच ज्वारीचे कणीस मोडून खळे करण्यासाठी गोळा करुण ठेवले आहे.हे कनसे काही शेतकऱ्याना झाकण्यास यश आले आहेत तर काही ठिकाणी शेतकऱ्याचे ज्वारीची कणसे भिजले आहेत.तसेच ज्वारीचा कडबा हा मुक्या जनावराच्या खाण्यासाठी उपयोगी असतो. परतुं तो कडबा भिजल्याने तो काळा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुक्या प्राण्याणा उन्हाळ्यामधील खादया खराब होते कि काया हा कडबा काळा पडूण खराब झाला तर शेतकऱ्या समोर मुक्या प्राण्याना उन्हाळ्यात काय खादया घालावे हा प्रश्न उभा राहिला आहे.तसेच मका हे पिकही भुईसपाट झाले आहे. मका पिकापासुन शेतकरी मुरघास तयार करुण कडबा व मुरघास हे एकत्र करुण उन्हाळ्यात आपल्या जनावरास तसेच बैलाना घालत असे.परतुं चाराच नष्ट झाल्याने दूध उत्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक चंचल भासनार आहे.


वाऱ्या सह गाराचां पाऊस झाल्याने फळबागेचीही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे फळे तोडणीला आली आहेत त्यातच गाराचा पाऊस झाल्याने फळे गळून गेली आहेत तसेच जे फळे झाडावरती राहिली आहेत त्यांना गाराचा मार लागून तीही काळी पडू लागली आहेत. त्यामुळे फळ बागेचे नुकसान झाले आहे. समंधीत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दखल घ्यावी व लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यास मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post