87 वर्षीय कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णाला डॉक्टरांनी दाखवला सूर्यास्त, फोटो व्हायरल




माय अहमदनगर वेब टीम
वुहान - चीनच्या वुहान शहरात सर्वात जास्त कोरोना ग्रस्त रुग्ण आहेत. शहरात 80 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. येथील वुहान यूनी हॉस्पीटलचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक डॉक्टर 87 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाला हॉस्पीटल बाहेर आणून सुर्यास्त दाखवत आहेत.
हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या फोटोवर एका युझरने लिहीले की, "खरच मनातून, मेडिकल केअर वर्कर्स आपले हिरो आहेत." दुसऱ्या एका युझरने लिहीले, "आशा करतो की, हा रुग्ण लवकर ठिक होईल." दरम्यान, हा रुग्ण पुरुष आहे की महिला, हे अद्याप समजू शकले नाहीये. हा फोटो @chenchenzh नावाच्या युझरने शेअर केला आहे.

रुग्णाला आनंदी आणि सकारात्मक ठेवण्यासाठी त्यांची इच्छा पूर्ण करतात डॉक्टर

वुहानच्या हॉस्पीटलमधील मेडिकल स्टाफ कोरोनाग्रस्त रुग्णांना पॉजिटिव्ह आणि आनंदी ठेवण्यासाठी हवं ते करत आहेत. हॉस्पीटलमध्ये डान्स आणि एक्सरसाइज क्लासदेखील घेतले जात आहेत. या कोरोनाग्रस्त रुग्णांचा एक डान्स व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले होते.
3400 जणांचा मृत्यू, 1 लाखांपेक्षा जास्त संक्रमित

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनने सांगितल्यानुसार, जगातील 90 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना पसरला आहे. यात आतापर्यंत 3486 (चीनमध्ये 3,073, इतर देशांमध्ये 413 ) मृत्यू झाला आहे. तर 101,927 संक्रमित झाले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post