यामुळे बुद्धी राहते तल्लख
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - स्वयंपाकघरात नेहमी आढळणारी हळद शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. भारतामध्ये हळदीची लागवड पूर्वीपासून केली जाते. हळदीचे रोप सुगंधी असते. हळदीच्या कंदाला जमिनीत गाठी फुटतात. या गाठी पिवळ्या आणि चमकदार. हळद पाण्यात टाकून पिल्याचेही अनेक फायदे आहेत. तर जाणून घेऊया हळदीचे इतर फायदे-
> हळदीमध्ये करक्युमिन नावाचे रसायन असते. ते औषध म्हणून काम करते. शरीरातील सूज कमी करण्यासाठी याची मदत होते.
> तुम्ही सकाळी गरम पाण्यात हळद टाकून ते प्यायले तर तुमची बुद्धी तल्लख राहते.
> हळदीत एक ताकदवान अँटीऑक्साइड असतात, जे कॅन्सरच्या कोशिकांशी टक्कर देतात.
> अनेक रिसर्चनुसार हळद रोज खाल्ल्याने पित्त वाढते, त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते.
> हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त गोठत नाही. रक्त साफ होण्यासही मदत होते.
Post a Comment