भारताचा पाकिस्तानवर 10 विकेट राखुन दणदणीत विजय



माय अहमदनगर वेब टीम
स्पोर्ट डेस्क - अंडर-19 विश्वचषकातीलपहिल्या सेमीफायनलमध्ये आज(मंगळवार) भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे. दक्षिण आफ्रीकेतील पोश्चफेस्ट्रूममध्ये झालेल्या या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत पाकिस्तच्यासंघाने 43 ओव्हरमध्ये सर्वबाद172 धावा काढल्या. या धावांचापाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघातील सलामीवीर यशस्वी जायसवाल आणि दिव्यांश सक्सेनाने हा सामना सहज आपल्या खिशात घातला.

सामन्यात यशस्वी जायसवालने नाबाद 105 तर दिव्यांश सक्सेनानेनाबाद 59 धावा काढल्या. या दोघांनी टूर्नामेंटमध्ये दुसऱ्यांना शतकीभागीदारी केली आहे. यापूर्वी त्या दोघांनी न्यूजीलँडविरोधात नाबाद 115 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडू कर्णधार रोहैल नजीरने सर्वाधिक 62 आणि हैदर अलीने 56 धावा काढल्या. भारतासाठी सुशांत मिश्राने 3 आणि कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post