बीडमध्ये जमिनीवर बसून सोडवला विद्यार्थ्यांनी पेपर




माय अहमदनगर वेब टीम
औरंगाबाद - माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेस मंगळवारी सुरुवात झाली. बोर्डाच्या नियमानुसार एक बाकावर एकच विद्यार्थी बसेल. परीक्षा केंद्रावर आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्याते असे जाहिर करण्यात आले होते. असे असतांनाही बीड जिल्हयातील रायमोहा अतुल कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची माहिती चुकीती देण्यात आली. अधिकचे विद्यार्थी असेल तर बाकांची व्यवस्था करावी अशा सूचना असतांनाही विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचा पेपर जमिनीवर बसवून सोडावा लागल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणानंतर जागे झालेल्या बोर्डाने आता महाविद्यालयाकडून खुलासा मागवला आहे.

विभागीय शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रावर सुविधा असाव्यात, बाकांची व्यवस्था नसेल तर इतर ठिकाणाहून तशी व्यवस्था करावी अशा सूचनाही बोर्डाकडून महाविद्यालयांना देण्यात आल्या होत्या. विशेष बाब म्हणजे अनेक महाविद्यालये केंद्र मिळण्यासाठी बोर्डाकडे सुविधा नसतांना माहिती सादर करतात. असे प्रकार वारंवार घडत असतांनाही या परीक्षा केंद्रास मान्यता देण्यापूर्वी बोर्डाच्या पथकाकडून पाहणी होते. तर तर विद्यार्थी संख्येच्या तुलनेत बाकांची संख्या नसतांनाही मग केंद्र दिले कसे असा सवाल आता बोर्डाच्या वर्तुळात होतो आहे. अतुल कनिष्ठ महाविद्यालयात बैठक क्षमता चारशे उपलब्ध बेंचेस ३५० असल्ाचे मंडळास दिलेल्या विहित नमुन्यातील हमीपत्रावर प्राचार्यांनी कळवले होते. त्या माहितीनुसार मंडळाने ३१८ विद्यार्थी दिलेले असतांना सदर परीक्षा केंद्रावर उपरोक्त प्रमाणे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था जमिनीवर करण्यात आली होती. याची दखल घेत बोर्डाने सदरील केंद्रास नोटीस बजावून अहवाल मागवला आहे. तसे पत्रही परीक्षा केंद्रास पाठविण्यात आल्याचे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post