बॅरेकमध्ये जाण्यास नकार दिल्यामुळे तुरुंगात राडा




माय अहमदनगर वेब टीम 
नवी दिल्ली- उच्च सुरक्षा असलेल्या तिहार तुरुंगातील जेल नंबर 4 मध्ये काल(शनिवार) कैदी आणि पोलिसांमध्ये हिंसक झडप झाली. या हाणामारीत अनेक कैदी जखमी झाले आहेत. तिहार प्रशासनाने सांगितले की, हा कैद्यांमधील आपापसात झालेले भांडण होते आणि यात गंभीर जखमी झालेल्या दोन कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, इतर कैदी किरकोळ जखमी झालेत.

तिहारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "दररोज दुपारी 12 ते 3 दरम्यान कैद्यांना बैरेकमध्ये ठेवले जाते. शनिवारी एका कैद्याने बॅरेकमध्ये जाण्यास नकार दिला. यात त्याने आपल्या सोबतच्या कैद्यांनाही सामील करुन घेतले. त्यानंतर पोलिसांसोबत त्यांची मारामारी झाली. शनिवारी दुपारी झालेल्या घटनेत इतर कैदीदेखील सामील झाले, त्यामुळे गोंधळ वाढला."

दोन कैदी गंभीर जखमी
जेल अधिकाऱ्याने सांगितले की, "या घटनेत दोन कैदी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दीन दयाल उपाध्याय हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या गोंधळात 10-12 कैदी जखमी झाले आहेत. घटनेनंतर तुरुंगाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post