माय अहमदनगर वेब टीम
बॉलिवूड डेस्क - लवकरच सारा अली खान निर्माता आनंद एल. रायच्या 'अतरंगी रे' चित्रपटात अक्षय कुमार आणि धनुष्यसोबत दिसणार आहे. तसे पाहिले तर कथानक आणि कलाकारांच्या पात्रांबद्दल काही खास माहिती अद्यापही समोर आलेली नाही. परंतु सारा या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. ती चित्रपटात अक्षय आणि धनुष यांच्या वेगवेगळ्या काळातील पात्रांसोबत रोमांस करताना दिसू शकते. चित्रपटात साराचे पात्र बिहारचे आहे.

'आमी जे तोमार' वर थिरकणार अभिनेत्री तब्बू
कार्तिक आर्यन आणि किआरा आडवाणीच्या आगामी 'भुल भुलैया-2' चित्रपटाचे शूटिंग सुरू झाली आहे. यातही आधीच्या चित्रपटातील गाणे 'आमी जे तोमार' रिक्रिएट केले जाईल. ते तब्बुवर चित्रीत केले जाईल. मात्र अजूनही निर्मात्यांकडून यावर अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. सूत्रानुसार, तब्बु या गाण्यासाठी खूपच उत्सुक आहे. गाण्याचे शूटिंग राजस्थानातील जयपूरमध्ये होणार आहे. जे 10 दिवस चालेल. त्यानंतर लखनऊमध्ये याचे काही शूटिंग होईल. खरं तर, याची घोषणा गेल्यावर्षी करण्यात आली होती. याची माहिती कातिर्क आर्यने इन्स्टाग्रामवर टाकली होती. कार्तिकने तब्बुचा फोटो शेअर करत लिहिले होते,'तबु मॅम आपका 'भुल भुलैया 2' के वर्ल्ड में स्वागत है'


दोन वेगवेगळी प्रेमकथा एकत्र दाखवली जाईल. अक्षय आणि धनुषच्या लूकबाबत माहिती मिळाली आहे. निर्मात्यांनी अक्षयसाठी एक खास लूक फायनल केला आहे. याशिवाय धनुषचे पात्रदेखील इतर पात्रांपेक्षा काही वेगळे असणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सारा आणि धनष मार्चपासून, तर अक्षय एप्रिलपासून सुरू करणार.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post