भारत-ऑस्ट्रेलिया सलामी सामना आज, प्रसारण दु. 1.30 वाजेपासून


माय अहमदनगर वेब टीम
सिडनी - तीन वेळचा सेमिफायनलिस्ट भारतीय संघ यंदा अंतिम फेरीचा पल्ला गाठण्यासाठी उत्सुक अाहे. यासाठी हरमनप्रीत काैरच्या कुशल नेतृत्वात भारताच्या संघाला अव्वल कामगिरीची अाशा अाहे. अाज शुक्रवारपासून अाॅस्ट्रेलियात महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेतील सलामी सामन्यात यजमान अाॅस्ट्रेलिया अाणि भारत यांच्यात झंुज रंगणार अाहे. त्यामुळे सलामीलाच चाहत्यांना पहिल्या दिवशी स्पर्धेतील तगडा मुकाबला पाहण्याची संधी अाहे. अाॅस्ट्रेलियाने अातापर्यंत चार वेळा विश्वचषकाचा बहुमान पटकावला अाहे. भारतीय महिला संघाला अातापर्यंत फक्त तीन वेळा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठता अाली. मात्र, अाता अंतिम फेरीतील प्रवेशाचा भारतीय संघाचा मानस अाहे.

मानधना स्मृती मानधनाच्या नावे सर्वाधिक अर्धशतके, राजेश्वरीच्या सर्वाधिक विकेट

अाॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मध्ये भारताकडून कर्णधार हरमनप्रीतने १७ डावांत ४१५ धावा काढल्या अाहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश अाहे. १३७ चा स्ट्राइक रेट. जेमिमाने सहा डावांत ९० अाणि शेफालीने तीन डावांत ६४ धावा काढल्या. तिरंगी मालिकेतील एका सामन्यात सलामीवीर शेफालीने ४९ धावांची अाक्रमक खेळी केली. तिच्याकडून अाता अव्वल कामगिरीची अाशा अाहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post